गेली कित्येक महीने भारतीय राजकारणात टीम अन्ना नामक पर्व सुरु आहे. मात्र जोपर्यंत हे पर्व भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करत होते तोपर्यंत जनतेन टीम अन्नाला डोक्यावर घेतल होत. मात्र तीच टीम अन्ना ज्यावेळी काश्मीर प्रश्नावर राष्ट्रदोही वक्तव्य करू लागली त्यावेळी,ज्या जनतेन त्यांना डोक्यावर घेतल तीच जनता टीम अन्ना विरोधात हिंसक प्रतिक्रिया देऊ लागली.
आता प्रश्न हा उद्भवतो की यात चुक कोणाची? टीम अन्नाची की जनतेची?
मला अस वाटत की यात पहिली चुक जनतेची आहे कारण जनतेन अन्नाना संसदेपेक्षा मोठ बनवल.संसदीय लोकशाहीत संसद हीच सर्वोच्च आहे याचा जनतेला विसर पडला आणि प्रसार्माध्यमान्नी सारासार विचार सोडून जो टीम अन्नाच्या विरोधात आहे तो देशद्रोही आहे अस चित्र निर्माण केल.याचा परिणाम असा झाला की टीम अन्नातीलाच काही सदस्यांचा असा गैरसमज झाला की आपली प्रत्येक भूमिका अणि विचार हा राष्ट्रवादीच असून आपल्या प्रत्येक विचाराला जनता मूक संमती देइल.या गैर्समजआतून टीम अन्नातील काही सद्स्यानी बाष्कल वक्तव्य करण्यास सुरुवात केली.अर्थात या सर्व घटनाना स्वतः अन्नादेखील जबाबदार आहेत कारण अन्नानी टीम अन्नाची कर्यकक्षा अगोदरच ठरवून द्यायला हवी होती.ज्यावेळी आन्दोलन ध्येयापासुन दूर जात आहे अस वाटल त्याचवेळी अन्नानी त्यास अटकाव करावयास हवा होता.पण अन्नानी सतत उपोशनाच हत्यार वापरून सरकारला वेठीस धर्न्यातच आनंद मानला.त्यातून आपल्या या भुमिकेमुल आपण संसदेच अवमूल्यन करतो आहोत याकड अन्नाच दुर्लक्ष झाल अस खेदान म्हनाव लागेल.
भारतीय लोकशाहीची आणखीन एक शोकांतिका म्हणजे आपल्या देशात व्यक्ति ही कालांतराने देशापेक्षा मोठी होते.आणि मग अशी देशापेक्षा मोठी झालेली व्यक्ति आपल्या आदर्शवादाच्या यद्न्यात देश्हिताचा बळी कधी देइल याचा काहीच भरवसा देता येत नाही.